बीडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका; हे दोन महत्वाचे नेते करणार वंचितमध्ये प्रवेश??

बीड |  आगामी विधानसभा निवडणकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीतला परफॉर्मन्स पाहून काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते वंचितकडे वळताना दिसून येत आहेत.

बीड जिल्ह्यातील केजचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि काँग्रेस नेते राजेसाहेब देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडी विधानसभेसाठी घेत असलेल्या मुलाखतीला हजेरी लावली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या दोन महत्वाच्या नेत्यांनी वंचितच्या मुलाखतीला हजेरी लावल्याने बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी मुलाखती देणं हा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध मतदारसंघातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असं दावा काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. याचदरम्यान आघाडीचे काही महत्वाचे नेते आणि पदाधिकारी वंचितकडून आपल्याला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता आघाडीला उभारी घेण्याची गरज आहे. मात्र कुठल्याही पक्षातून उमेदवारी मिळाली पाहिजे, हेच ध्येय आघाडीच्या काही नेत्यांनी समोर ठेवलेलं दिसतंय. ही आघाडीसाठी मोठी धोक्याची घंटा मानली जातीये.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना आता खावी लागणार जेलची हवा!

-राज ठाकरेंकडून काय धडा घेतला??? आदित्य ठाकरे म्हणतात…

-…अन् खासदार नवनीत राणांनी आपला पहिला पगार मुख्यमंत्र्यांना दिला!

-काँग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही आणि भ्रष्टाचार- चंद्रकांत पाटील

-पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता?- राज ठाकरे