देश

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर हा धक्कादायक व्हीडिओ पाहून तुम्हाला संताप येईल!

Zomatto

मुंबई : आजकाल अनेकजण ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असतात. अशा ग्राहकांसाठी धक्कादायक असा एक व्हीडिओ समोर आला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीचा एक कर्मचारी रस्त्यातच पार्सलमधील काही खाद्यपदार्थ खात असल्याचं या व्हीडिमध्ये दिसत आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. 

पार्सलमधील खाद्द्यपदार्थावर चोरुन डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्याच्या टी-शर्टवर ‘झोमॅटो’ या कंपनीचं नाव दिसत आहे. हा व्हीडिओ कुठला आहे आणि कुणी काढला ते अद्याप समजू शकलेलं नाही. 

झोमॅटोने देखील अद्याप याप्रकरणी स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र या व्हीडिओत दिसणारा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. 

दरम्यान, हा व्हीडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे. 

व्हीडिओ पाहा-

( ही बातमी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक-व्हॉट्सअॅपवर शेअर करा…)