देश

झोपलेला असताना तरुणाच्या पॅंटमध्ये शिरला कोब्रा अन्….; सात तास रगंला होता थरार!

मिर्झापूर| उत्तर प्रदेश मधील मिर्झापूर येथे एक नवल वाटणारी आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एक युवक झोपलेला असताना या युवकाच्या पँटमध्ये कोब्रा साप शिरला होता. तब्बल सात तासाने सर्पमित्राने युवकाच्या पँटमधून साप काढला व युवकाची सुटका झाली.

सिकंदराबाद परिसरात काही मजूर काम करत होते. या मजुरांची राहण्याची व्यवस्था तेथील शाळेमध्ये करण्यात आली होती. दिवसभर काम केल्याने हे मजूर रात्री गाढ झोपी गेले होते. रात्री झोपलेले असतानाच लवलेश नावाच्या युवकाच्या पँटमध्ये रात्री बाराच्या सुमारास साप शिरला.

पँटमध्ये वळवळ करू लागल्याने लवलेश जागा झाला. जाग आल्यानंतर पँट मध्ये साप शिरल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर तो हळूच शेजारच्या खांबाला धरून कसलीही हालचाल न करता रात्रभर उभा राहिला.

दरम्यान, तब्बल सात तासाने सर्पमित्र तेथे आला. सर्पमित्राने लवलेशची पँट कापून सापाला बाहेर काढलं. साप बाहेर काढल्यानंतर तो साप कोब्रा जातीचा असल्याचं समजलं. लवलेशचं नशीब बलवत्तर असल्याने त्याची सुखरूप सुटका झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

कौतूकास्पद! रक्ताच्या नात्यांनी अंत्यसंस्कारासाठी नाकारलं पण माणुसकीच्या नात्याने निभावलं; सरपंचाने घातला अनोखा आदर्श

औरंगाबादमध्ये हृदयद्रावक घटना! तीन सख्ख्या भावांसह पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

धक्कादायक! कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने एसटी कर्मचाऱ्याने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

ठाकरे सरकारचं स्टिअरिंग नेमकं कोणाच्या हातात?; उद्धव ठाकरे म्हणाले

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार- रावसाहेब दानवेंचा टोला