Uncategorized

कोरोनाच्या कृपेने 33 वर्ष परीक्षा देणारा विद्यार्थी अखेर झाला मॅट्रीक पास!

हैद्राबाद | सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयामुळे हैद्राबाद येथील 51 वर्षीय मोहम्मद नुरुद्दीन हे 33 वर्षानंतर दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

मोहम्मद नुरुद्दीन हे गेली 33 वर्ष बोर्डाचे पेपर देत होते. नुरुद्दीन यांचा इंग्रजी हा विषय कच्चा असल्यामुळे त्यांना या परीक्षेत सतत अपयश मिळत होतं. मात्र, तरीही कधीही खचून न जाता त्यांनी प्रत्येक वर्षी बोर्डाचे पेपर दिले. यावर्षी त्यांची नशिबाने साथ दिली आणि बोर्डाचा इंग्रजीचा पेपर कोरोना महामारीमुळे कॅन्सल झाला व नुरुद्दीन पास झाले.

कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्व बोर्डांनी आपले पेपर रद्द केले आणि ज्या विषयांचे पेपर झालेत त्या विषयांच्या मार्कांच्या सरासरीवरून इतर विषयांचे मार्क देण्यात आले. नुरुद्दीन यांचा नेमका इंग्रजीचा पेपर राहिला होता. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीवरून त्यांना इंग्रजीचे मार्क्स देण्यात आले आणि ते उत्तीर्ण झाले.

देशभरात बोर्डाचे पेपर सुरू असतानाच कोरोनाचा संसर्ग वाढू लागला होता. त्यामुळे याचा बोर्ड परिक्षांवर परिणाम झाला होता. कोरणामुळे यावर्षी बोर्डाचे निकाल पाहण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागली होती.

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक कुटूंब नसून ते लिव्ह इन रिलेशनशिप- देवेंद्र फडणवीस

मैत्रीच्या नात्याला काळिमा! दारू पिताना झालेल्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून

आता धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे पण राज्य सरकारची तशी तयारी दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे