Uncategorized पुणे महाराष्ट्र

कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवांरानी चांगलंच झापलं; जनाची नाही तर…

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात काल बैठक झाली. यावेळी कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीच्या गोंधळावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांनाच झापलं.

कोरोनाची खरी आकडेवारी बाहेर येत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार सरकारवर करत आहे. यातच काल झालेल्या पुण्यातील बैठकीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीच्या गोंधळावरून अजित पवार अधिकाऱ्यांवर बरसले. मी हे बोलणं योग्य नाही, मात्र जनाची नाहीतर…,अशा शब्दात मुख्यमंत्र्यासमोरच पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. त्यामुळे कागदी  घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांची गोची झाली.

अजित पवार यांनी या बैठकीत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या कामाचे कौतुकही केलं. तर विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना जबाबदारीची जाणीवही करुन दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, अधिकाऱ्यांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, मात्र कृतीत ते कमी पडतात.  या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

“…नाहीतर नेहमीप्रमाणेच ‘शिक्षणाच्या आयचा घो’ होईल”

विजेच्या झटक्यामुळं होत्याचं नव्हतं झालं; तीन चिमुकल्या सख्ख्या बहिणींना एकसाथ नेलं

“महिला सुरक्षेवर न थकता भाषणं देणारे नेते कुठं आहेत?, सरकारला केव्हा जाग येणार आहे”

सलाम सोनू! 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी, वाढदिवसानिमित्त सोनूनेच दिलं सर्वांना गिफ्ट!

फूटपाथवर राहून दहावीत उत्तीर्ण झालेल्या अस्माला घर मिळवून देणयासाठी प्रयत्न करणार- आमदार प्रताप सरनाईक