20 लाख का आँकडा पार, गायब है मोदी सरकार; राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली | देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. प्रशासन आपापसन पातळीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र लॉकडाऊन उघडल्यापासून कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणात वाढू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल दांधी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

जुन्या ट्वीटचा हवाला देत राहुल यांनी लिहिले की देशात कोरोनाची आकडेवारी 20 लाखांच्या पुढे गेली असून केंद्रातील मोदी सरकार मात्र गायब झालं आहे.

राहुल गांधींनी 17 जुलैला एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी कोरोनाचा आकडा 10 लाख पार केल्याचा उल्लेख केला होता. याशिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलायला हवीत, असंही राहुल गांधींनी ट्वीट केलं होतं. मात्र10 ऑगस्टआधीच पुन्हा एकदा देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाखहून अधिक असल्याचं समोर आल्यानं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान,भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख पार केला आहे. त्यामध्ये 13 लाख 70 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 41 हजाहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता निर्णय घ्यायला शिकावं”

चीनला झटका, भारतानंतर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही- संजय राऊत

महानायक अमिताभ यांनी लेखकाची मागितली माफी; मी चुकलो..

कोरोनामुळे सर्व मंडळांनी यावर्षी देखावे आणि मिरवणुक टाळाव्यात; पुण्याच्या महापौरांचं आवाहन