“विद्यार्थांना फी भरण्याची सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच फी घ्यावी”

अमरावती | कोरोनामुळे मागील काही दिवस लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प होते. अनेक लोकांना रोजगार नाही. देशाच्या विविध भागात काही कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या आता ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालये चालू झाल्याने शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना फीसाठी सक्ती करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सक्ती करणाऱ्या संस्थांना एक सज्जड इशारा देत एक मागणी केली आहे.

ज्या संस्था या पालकांच्या भरवश्यावर मोठ्या झाल्या अशा संस्था फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का?, जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थांनी लक्षात ठेवावं, असा सज्जड इशारा  बच्चू कडू यांनी दिला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांकडून 50 टक्केच शुल्क आकारावं, अशी मागणीही कडू यांनी केली आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांची मागणीही रास्तच आहे. कारण जर संस्थांनी अर्धी फी घेण्याचा निर्णय घेतला तर पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे रोजगार नाही, घर चालवण्याची परापत आणि त्यात पाल्याची फी एखाद्या ओझ्याप्रमाणेच त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे शालेय संस्था ही मागणी करतात याकडे पालकांचं लक्ष्य लागून आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर सरकारला शॉक देऊ; वाढीव वीज बीलावरून राजू शेट्टी आक्रमक

DTH च्या ग्राहकांना मिळत आहे चार दिवस मोफत टीव्ही पाहण्याची संधी; कसं ते जाणून घ्या!

रणवीर रेपिस्ट तर दीपिका सायको आहे; कंगना रनौत पुन्हा भडकली

राष्ट्रवादीला पुन्हा एकदा गळती; ‘या’ बड्या नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश

‘तहसीलदार महिलेच्या पतीकडून माझ्या जिवाला धोका आहे’; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल