Top news महाराष्ट्र सोलापूर

आनंदची यशोगाथा! ज्या इयत्तेत झाला होता नापास त्याच इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आज त्याचा धडा

सोलापूर | एकेकाळी नववीत नापास झालेल्या मुलाचा आज नववीच्याच पुस्तकात धडा शिकायला आहे. होय ही कथा आहे, स्वतःच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर भरघोस यशाचा मानकरी असणाऱ्या आनंद बनसोडेची.

लहानपणी दहा बाय दहाच्या चौकोनी झोपडीत राहून आनंदने आपलं बालपण काढलं. वडील पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाढा चालवत होते. आनंद शिक्षणात एवढा काही हुशार नव्हता त्यामुळे नववीमध्ये असताना तो नापास झाला. यामुळे मुख्यध्यापकांनी आनंदच्या आईला बोलावून अपमानित केलं होतं. आपल्या झालेल्या अपमानामुळे आईच्या डोळ्यात अश्रू आले.

आपल्यामुळे आईच्या डोळ्यात अश्रू आल्याने आनंदने आयुष्यात खूप मोठं काहीतरी करुन पालकांचं नाव उंचवण्याचं ठरवलं. भरपूर अभ्यास करून त्यानं दहावीमध्ये पहिला नंबर पटकावला. पुढे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होत बीएससी पूर्ण केली. मात्र, आनंदला त्याचे लहानपणीचे स्वप्न शांत बसू देत नव्हते.

दरम्यान, पुण्यातील गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्या मदतीने आनंदने गिर्यारोहणाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने मित्र आणि पालकांच्या मदतीने पैसे गोळा करत 19 मे 2012 रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या खंडातील वेगवेगळी शिखरे सर करत आनंद आत्तापर्यंत 62 वेगवेगळ्या पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर आनंदनं त्याच्या मेहनतीने नाव कोरलंआहे.

महत्वाच्या बातम्या-

….म्हणून बायकोने रात्री झोपेत असताना नवऱ्याच्या तोंडावर केले सपासप वार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

धक्कादायक! अंगणात तीन चिमुरड्यांचा रंगला होता डाव अन् अचानक…

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतच्या जवळच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट