Top news राजकारण

चार पाच लफडी ठेवणं हा तर शिवसेना आमदार, खासदारांचा धंदाच आहे- निलेश राणे

मुंबई | राज्यात सरकार आणि विरोधीपक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. नुकतंच शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आमच्या नेत्यांमध्ये दोन काय चार बायका सांभाळण्याची ताकद आहे, असं वक्तव्य केलं होतं. मात्र या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेत्यांवर टीका केली आहे.

आम्हाला माहीत आहे चार पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा आहे. पुरावे द्यायची पण गरज नाही कारण जग जाहीर आहे. हा खासदार आहे म्हणजे आपल्याला कळलं असेल हा दिल्लीला जाऊन काय करत असेल, असं म्हणत निलेश राणे यांनी टीका केली आहे. भाजप नेते राम शिंदे यांनी केलेल्या टीकेवर खासदार सदाशिव लोखंडे यांनी  प्रत्युत्तर दिलं होतं.

एक नवऱ्याच्या दोन बायका अशी या सरकारची अवस्था असून हे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार नसून तिघाडी सरकार असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, राम शिंदेंनी टीका केल्यावर महाविकास आघाडीतील खासदार लोखंडे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.  मात्र राम शिंदेंच्या टीकेवर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही परंतू राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; ट्रोलर्सच्या प्रश्नांवर मौन सोडत अंकिता लोखंडेनं सांगितलं कारण

अबब ! कोरोना नसतानाही तरुणावर केले कोव्हीडचे उपचार अन्…

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री