राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी योगदान दिलं आहे; भाजपच्या ‘या’ खासदाराचा घरचा आहेर!

नवी दिल्ली | राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त 5 ऑगस्टला ठरला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भूमिपूजनाची तयारीही जोरदार चालू आहे. मात्र अशातच भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी मोठं वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राम मंदिरासाठी कोणतंही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचं झालं तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव घ्यावं लागेल, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.  टीव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी वक्तव्य केलं आहे.

टीव्ही 9 भारतवर्ष या कार्यक्रमादरम्यान सुब्रमण्यम स्वामींना राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आणखी कोणाकोणाला निमंत्रण द्यायला हवं होतं, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी बोलताना हे उत्तर दिलं.

दरम्यान, राम सेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याबाबतची फाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलवर गेल्या ५ वर्षांपासून पडून आहे. मात्र, त्यांनी आजवर यावर स्वाक्षरी केलेली नाही. मी कोर्टात जाऊन यावर आदेश मिळवू शकतो. मात्र, मला वाईट वाटतंय की आमचा पक्ष असतानाही आम्हाला कोर्टात जावं लागत आहे, असं स्वामींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘…म्हणून मी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह’; अभिषेक बच्चनने सांगितले कारण!

मॉलला परवागनी मग जिमला का नाही?; सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा सरकारला प्रश्न!

… तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा इशारा

आश्चर्यकारक! लग्न न करताच ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला होता बाबा

दिलासादायक! अमिताभ बच्चन यांना आज मिळणार डिस्चार्ज