Top news क्राईम

….म्हणून बायकोने रात्री झोपेत असताना नवऱ्याच्या तोंडावर केले सपासप वार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

दाहोद | पत्नीने टेस्टी भजी बनवली नाही म्हणून पतीने पत्नीला टोमणे मारले. त्यामुळे राग आलेल्या पत्नीने रात्री पती झोपलेला असताना त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील दाहोद तालुक्यातील वडभरा या गावात घडली आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

रमिला मिनाना आणि बाडूभाई मिनाना हे दाम्पत्य गेल्या 15 वर्षांपासून एकत्र संसार करत होते. या दोघांना तीन मुले आहेत. इतर दाम्पत्याप्रमाणे यांच्यातही छोटी मोठी भांडण होतंच होती. मात्र, रमिलाने केलेली भजी बाडूभाई यांना आवडली नाहीत म्हणून बाडूभाईंनी पत्नीला टोमणे मारले.

याच रागातून बाडूभाई झोपलेले असताना त्यांच्या पत्नीने बाडूभाईंच्या डोक्यात प्रथम दगड घातला आणि नंतर धारधार शस्त्राने त्यांच्या तोंडावर तसेच गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या बाडूभाईंचा अतिरक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

बाडूभाईंच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. गुजरात पोलिस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! अंगणात तीन चिमुरड्यांचा रंगला होता डाव अन् अचानक…

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतच्या जवळच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याचा विचार असतो”