Top news

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

मुंबई |  आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं नाही. महाविकास आघाडी सरकार जास्त काळ काही टीकणार नसून ते पक्षातील अंतर्गत कलहानेच पडणार आहे, असं विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र अशातच भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

तीन पक्षांचं सरकार व्यवस्थितपणे चालू असून आमच्या सरकारला कसलाही धोका नाही. आमचं सरकार अस्थिर आहे असण्याचा प्रश्नच येत नाही उलट आता विरोधी पक्षच अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. कारण  त्यांच्या  40 आमदारांची यादी तयार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून विरोधी पक्षच अस्थिर असल्याचा टोला राज्यमंत्री बच्चू कडू भाजपला लावला असून पुढील 5 वर्षे महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहणार असल्याचं कडू यांनी सांगितलं.

दरम्यान, बच्चू कडूंनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कारण 100 पेक्षा अधिक जागा असलेल्या भाजपला तिन्ही पक्षांनी एकत्र येत विरोधी पक्षात बसवलं मात्र आता 40 आमदार फुटले असल्याचं कडूंनी बोलल्यामुळे सर्वांच्या भुया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याचा विचार असतो”

झोपेत असलेल्या तरुणाच्या पॅंटमध्ये कोब्रा नाग शिरला अन्…

‘वडील रुग्णालयात भर्ती, आता कोणच्या जीवावर खाणार’; अभिषेक बच्चनने हेटर्सना दिलं हे सणसणीत उत्तर!

धक्कादायक! पत्नीसह नातेवाईकावर कोयत्याने सपासप वार करत दोघांना संपवलं

संतापजनक! पुन्हा एकदा महिला आरोग्य कर्मचाऱ्यासोबत घडला संतापजनक प्रकार