मॉलला परवागनी मग जिमला का नाही?; सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा सरकारला प्रश्न!

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने 31 ऑगस्टपर्यंत पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलं. मात्र हे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आलं. यामध्ये काही गोष्टी खुल्या करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आणि काही गोष्टी अजूनही बंद आहेत. यामध्ये देशात जिमला परवागनी देण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रात अद्यापही जिमला परवानगी मिळाली नसल्याने जिममालक आणि ट्रेनर यांनी राज्य सरकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

31 ऑगस्टच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने नवे नियम लागू केले यामध्ये महाराष्ट्रात जिम सुरु करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर सलमान खानचा मराठमोळा ट्रेनर मनीष आडविलकर याने ठाकरे सरकारला प्रश्न विचारला एक मागणी केली आहे.

सुरूवातीला पुर्ण बंद असताना समजू शकतो मात्र आता पाच महिने उलटून गेले तरी जिम चालू करण्यासाठी परवानगी नाही. मॉलला परवानगी दिली जाते, सलूनला, ट्रेनला परवानगी दिली जाते. बाजार सुद्धा भरतो आहे. मग आरोग्यासाठी इतक्या महत्त्वाच्या जिमला परवानगी का नाही?, असा सवाल मनीष आडविलकरने सरकारला केला आहे.

दरम्यान, देशात जिमला परवानगी देण्यात आली. मग महाराष्ट्रात जिमला परवानगी का नाही?, असा प्रश्न राज्यातील जिम मालक विचारत आहेत. लाखो रुपये भांडवल आणि लाखो रुपयांचं भाडं भरुन जिम मालकांवर आर्थिक संकट सहन करण्याची वेळ आली. सरकारने लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा, असं जिम मालकांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या-

… तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा इशारा

आश्चर्यकारक! लग्न न करताच ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला होता बाबा

दिलासादायक! अमिताभ बच्चन यांना आज मिळणार डिस्चार्ज

चार पाच लफडी ठेवणं हा तर शिवसेना आमदार, खासदारांचा धंदाच आहे- निलेश राणे

संतापजनक ! रात्रीचा डाव साधत 83 वर्षीय वृद्ध महिलेवर युवकांनी केला बलात्कार