Uncategorized

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर दु: खाचा डोंगर; राजेश टोपेंच्या मातोश्रींचं निधन

मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टापे यांच्या मातोश्रीचं दु:खद निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपसून त्या आजारी होत्या. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.  शारदाताई अंकुशराव टोपे असं टोपेंच्या मातोश्रींचं नाव  होतं.

जवळपास दीड महिन्यापासूनपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. कारोनाच्या या काळात राज्याची काळजी आणि दुसरीकडे आई दवाखान्यात त्यामुळे राजेश टोपेंची दुहेरी करसत चालू होती.

राजेश टापेंच्या आईला हद्यविकाराचा आणि मूत्रपिंडाचा आजार होता. रोज सकाळी तिची भेट घेतो. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा भेटतो. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे टोपे यांनी माध्यमांस बोलताना सांगितलं होतं.

दरम्यान, उद्या 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

देशाच्या राजकारणावर पसरली शोककळा ‘या’ खासदाराचे निधन

‘ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो’; राम शिंदेच्या टीकेला ‘या’ खासदाराचं प्रत्युत्तर!

सुशांतच्या आत्महत्येच्या रात्री सुशांतसोबत असणाऱ्या मित्राने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहानी; म्हणाला…