Top news महाराष्ट्र सांगली

‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

सांगली | सध्या महाराष्ट्रात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप प्रत्यरोप चालूच आहेत. ‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’ असं म्हणत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

महायुतीच्या वतीनं सध्या राज्यभर दूध दरवाढ मागणीसाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलनावरूनच राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधत ‘हे आंदोलन म्हणजे कोंबडी चोरीचं आंदोलन असलेल्या व्यक्तींनी केलेलं आंदोलन’, असं म्हटलं होतं.

राजू शेट्टी यांनी केलेल्या या टीकेवर पलटवार करत सदाभाऊ खोत म्हणाले, ‘राजू शेट्टी हा आता काजू शेट्टी झाला आहे. या माणसाला आता कोणीच किंमत देत नाही. तसंच त्याची अवस्था आता गावात सोडलेल्या वळू प्रमाणे झाली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्याप्रमाणे सोडलं आहे.

मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमीनी घेऊन ठेवल्या आहेत. तसेच जाईल तिथे खंजीर खुपासणारे राजू शेट्टी बारामतीमध्ये आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिली नाही,  असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.  सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जन्मदात्याचं ‘ते’ वाक्य जिव्हारी लागल्याने आठवीत शिकणाऱ्या मुलीने संपवलं आपलं आयुष्य!

….म्हणून बायकोने रात्री झोपेत असताना नवऱ्याच्या तोंडावर केले सपासप वार; कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

कोरोनाच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचार करत आहे- चंद्रकांत पाटील

धक्कादायक! अंगणात तीन चिमुरड्यांचा रंगला होता डाव अन् अचानक…

रक्षाबंधन दोन दिवसांवर असताना कोरोनाने महापौर किशोरी पेडणेकरांच्या मोठ्या भावाचा केला घात!!