संजय दत्तला कर्करोगाचं निदान झाल्यावर पत्नी मान्यताची भावनिक पोस्ट; म्हणाली…

मुंबई| अभिनेता संजय दत्त यांनी जीवनात अनेज चढउतार पाहिले आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले असून त्यांच्यावर संजू नावाची बायोग्राफी आली आहे. सगळं काही सुरळी चाललेलं असताना आयुष्याने पुन्हा एकदा त्यांना वादळात अडकवलं आहे. कोरोनाचा हाहाकार दूर होण्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. कारण त्यानां पुन्हा एकदा आपल्या दमदार कामाला सुरुवात करायची असं ठरवलं होतं मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं कारण संजय दत्त यांना कर्करोग झाल्याचं संमजलं. अशातच अशातच संजय दत्त याची पत्नी मान्यता हिने सोशल मीडियावरून चाहत्यांना आवाहन केलं आहे.

संजू नेहमी लढवय्या राहीला आणि आमचं कुटुंबही. परमेश्वर पुन्हा आमची परीक्षा घेतोय. परमेश्वराला बघायचंय की, आम्ही कसं या संकटाचा सामना करतो. आम्हाला फक्त तुमची प्रार्थना आणि आशीर्वादाची गरज आहे, अशी अपेक्षा संजय दत्त याची पत्नी मान्यता हिने व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून आमचं कुटुंब अनेक संकटांमधून गेलं. मला विश्वास आहे की, ही वेळ, हा प्रसंगही निघून जाईल. संजूच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज असल्याचं मान्यताने सांगितलं आहे.

दरम्यान, डॉक्टरांच्या दिलेल्या माहितीनुसार आधी सांगण्यात आलं की बॅक्टेरियल इन्फेक्शन , टीबी किंवा कॅन्सर असू शकतो. टेस्ट साठी त्याच्या फुफुसातून दीड लिटर पाणी काढले. त्यात आढळून आले की त्यांना कॅन्सर आहे. त्यानंतर PET स्कँन मध्ये ही त्यांना कॅन्सरचं निदान झालं. संजय दत्त ज्या स्टेज वर आहेत त्यावर कोणतीही  शस्त्रक्रिया होणे अशक्य असून केवळ किमोथेरपी करण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“अजित पवारांनी आणि पाटलांनी बाकी पक्षांच्या आमदारांची चिंता नका करू नये, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा”

ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तसं करणार नाही, भाजपने हा वाद सुरू केला; मनसेकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण

“सुशांतच्या मृत्युवरून पत्रकार परिषद घेणाऱ्या राणेंनी मात्र आपला भाऊ अंकुश राणेंच्या हत्येबाबत ब्रही नाही”

शरद पवार म्हणाले पार्थ इमॅच्युअर, त्यालाच ‘नया है वह’ असं म्हणतात- छगन भुजबळ

…म्हणून किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ‘आदित्य ठाकरे’!