Top news मनोरंजन

‘…म्हणून मी अजूनही कोरोना पॉझिटिव्ह’; अभिषेक बच्चनने सांगितले कारण!

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज अमिताभ यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अभिषेक बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून वडिलांच्या डिस्चार्जची माहिती देत सर्व चाहत्यांनी केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याबरोबरच, बिग बी घरीच थांबून आराम करतील असंही सांगितलं आहे. मात्र, अद्याप अभिषेक बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नाही.

आपल्या आरोग्याची माहिती देताना अभिषेक आणखी एक ट्विट करत म्हणाले, “दुर्दैवाने इतर काही व्याधींमुळे माझा रिपोर्ट पोझिटीव्ह आला असून मला काही कारणांमुळे रुग्णालयातच थांबावं लागणार आहे. पुन्हा एकदा माझ्या कुटुंबासाठी केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी यावर मात करून निरोगी परतेन असं आश्वासन देतो.”

दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र, त्यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

मॉलला परवागनी मग जिमला का नाही?; सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा सरकारला प्रश्न!

… तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा इशारा

आश्चर्यकारक! लग्न न करताच ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला होता बाबा

दिलासादायक! अमिताभ बच्चन यांना आज मिळणार डिस्चार्ज

चार पाच लफडी ठेवणं हा तर शिवसेना आमदार, खासदारांचा धंदाच आहे- निलेश राणे