सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी गेले कित्येक दिवस अनेकांनी केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात चौकशीवर सुनावणी होणार होती.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवला आहे. याआधी हा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र भाजप आणि सुशांतच्या नातेवाईकांनी हा सीबीआयकडे सापवावा, अशी मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत की सुशांतच्या प्रकरणातचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत. पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय महाराष्ट्राने नाकारला असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान, सुशांतच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर अनेक आरोप केले होते. बिहार आणि महाराष्ट्रात यावरून वादंग पेटला होता.

महत्वाच्या बातम्या-

चौकशीच्या घेऱ्यात सापडलेल्या रियाला मोठा चक्रवर्ती झटका!

…म्हणून शरद पवारांनी पत्र लिहित नरेंद्र मोदींना केली ‘ही’ मागणी!

मोदी सरकार चीनला आर्थिक क्षेत्रात मोठा दणका देण्याच्या तयारीत

आई टोपली विणायची अन् बाप दारू प्यायचा, मात्र अखेर जिद्दीने ‘तो’ कलेक्टर झाला

…तर महाविकास आघाडीने सत्ता भाजपकडे सुपूर्द करावी- सुजय विखे पाटील