‘ते’ हत्यांकांड फक्त एका फोनसाठी, गुन्ह्यामध्ये दोन मुलींचाही समावेश; त्या रात्री नेमकं पुलावर काय घडलं?!

अहमदाबाद – सध्याचे गुन्हे कोणत्याही गोष्टीवरून होत आहेत. काहीवेळा चालताना किंवा गाडी चालवत असताना पाहिलं म्हणूनसुद्धा मारहाणीचे प्रकार घडत आहे. हे एक सांगायला झालं परंतू गुन्हा कोणत्या गोष्टीमुळे घडेल याचा काही आता नेम नाही. याचाच प्रत्यय गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका गुन्ह्यातून आला आहे. हा गुन्हा फक्त एका मोबाईलसाठी झाला आहे.

उमंग दारजी नावाच्या एका तरूणाची रात्री 11 च्या सुमारास खोखरा गुरूजी पुलावर गेल्या शुक्रवारी हत्या करण्यात आली होती. उमंग दारजी रस्त्यावरून जात असताना त्याला मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार केले गेले. या प्रकरणात आरोपींचा हत्या झालेल्या तरूणाशी कोणताही संबंध नव्हता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्यावर एक वेगळच सत्य समोर आलं.

या गुन्ह्यात तीन आरोपींचा समावेश होता. घोडासर येथील कृणाल दलवाडी (वय 30), हाटकेश्वर येथील हार्दिक अग्रवाल (वय 22) आणि श्याम राठोड (वय 24) अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह गुन्ह्यात दोन अल्पयीन मुलींचा समावेश आहे.

आरोपींमधील अल्पवयीन मुलींपैकी एकीने फोन हवा होता. त्यावर श्याम, हार्दिक आणि कृणाल याने रस्त्याच्या पलीकडे जाऊन उमंग याला अडवलं  आणि त्याच्यावर चाकूने वार केले. आरोपींनी वार करत त्याच्याकडून मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला, अशी माहिती जे डिव्हिजनचे एसीपी राजपालसिंह राणा यांनी दिली. यावेळी त्यांनी आरोपींना कशाप्रकारे गजाआड केलं हेही सांगितलं.

दरम्यान, उमंगच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांना एका अज्ञान व्यक्तिने त्यांना फोन केला आणि उमंगच्या हत्येबाबत माहिती दिली. तो अज्ञान व्यक्ती आरोपींमधील एका अल्पवयीन मुलीला ओळखत होता. या माहितीवरून दलवाडीला पोलिसांनी घेरलं त्यावेळी आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी इतर आरोपींकडून त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर घेतला यावरून त्याला ट्र‌ॅक केलं असल्याचं ईसानपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. ए. सोलंकी यांनी सांगितलं.