Top news

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

अहमदनगर | महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी जहरी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. दूध दरवाढीसाठी सोलापूर-नगर महामर्गावर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारने पाच रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सरकारने अजुनही अनुदान दिलं नसल्याचं म्हणत राम शिंदे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही, असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमच्या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत चालू असून कोणत्याही प्रकारची अस्थिरता नाही. याउलट विरोधी पक्षामध्येच आता अस्थिरता असल्याची परिस्थिती निर्माण होणार आहे कारण भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या जवळच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याचा विचार असतो”

झोपेत असलेल्या तरुणाच्या पॅंटमध्ये कोब्रा नाग शिरला अन्…

‘वडील रुग्णालयात भर्ती, आता कोणच्या जीवावर खाणार’; अभिषेक बच्चनने हेटर्सना दिलं हे सणसणीत उत्तर!