पुणे महाराष्ट्र

कोरोना पॉझिटिव्ह आईने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म; बाळांचे रिपोर्ट आले…

पुणे| सध्या संपूर्ण जगाला कोरोनानं विळखा घातला आहे. पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. मात्र अशताच पुण्यातील महापालिकेच्या रुग्णालयातून एक सुखकर बातमी समोर आली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या आईने पुण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. कोरोना पॉझिटीव्ह महिलेला प्रसूतीसाठी पुण्यातील महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

महिला गरोदर असल्याने या महिलेची रुग्णालयातील डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली. या महिलेने दोन गोंडस बाळांना जन्म दिला असून दोन्ही बाळं आणि त्यांची कोरोना पॉझिटीव्ह आई असे तिघेही सुखरूप आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ही माहिती दिली आहे. तसेच मोहोळ यांनी महिलेची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे पुणेकरांच्या वतीने आभार मानत अभिनंदन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला झाली लगीनघाई पण जोडीदारीण मिळेना, उद्यापासून लॉकडाऊन तोडा- प्रकाश आंबेडकर

कोरोनाच्या कृपेने 33 वर्ष परीक्षा देणारा विद्यार्थी अखेर झाला मॅट्रीक पास!

‘कोहलीला अटक करा’; उच्च न्यायालयात याचिका दाखल

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक कुटूंब नसून ते लिव्ह इन रिलेशनशिप- देवेंद्र फडणवीस

मैत्रीच्या नात्याला काळिमा! दारू पिताना झालेल्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून