खेळ

‘कोहलीला अटक करा’; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | कोरोनाकाळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत वेगवेगळे क्षण शेअर करत आहे. तो सोशल मिडियाद्वारे चाहत्यांबरोबर चांगलाच जोडला गेला आहे. मात्र, मद्रास उच्च न्यायालयात विराट कोहलीला अटक करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या बातमीमुळे विराटच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

विराट कोहली ऑनलाइन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. विराट कोहलीबरोबरच अभिनेत्री तमन्ना हिच्याही अटकेची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका चेन्नईच्या एका वकिलानं दाखल केली आहे.

आजकालच्या युवकांच वाढत जाणार अॅपच व्यसन पाहता ऑनलाइन जुगार खेळण्याच्या अॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याबरोबरच, विराट आणि तमन्ना हे युवकांची दिशाभूल करणाऱ्या अॅपची जाहिरात करून त्यांना फसवत आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक करण्याची मागणी याचिकेत केली आहे.

एका युवकान ऑनलाइन अॅपसाठी पैसे उसने घेतले होते. मात्र, तो पैसे परत न देवू शकल्याने त्याने आत्महत्त्या केली. हा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयात मंगळवारी याबाबतीत सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक कुटूंब नसून ते लिव्ह इन रिलेशनशिप- देवेंद्र फडणवीस

मैत्रीच्या नात्याला काळिमा! दारू पिताना झालेल्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून

आता धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे पण राज्य सरकारची तशी तयारी दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

राम मंदिराच्या भूमिुपूजनावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; राम मंदिराचं भूमिपूजन आत्ता न होता…

आताही सांगतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही कारण…- राज ठाकरे