पाहा दहावी-बारावीचा निकाल कधी लागू शकतो… मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलंय!

पुणे | जुलैच्या मध्यावधीत बारावीचा आणि जुलै अखेर दहावीचा निकाल लागू शकतो, अशा माहिती  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिक्षण विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी निकालाची तारीख समोर आली.

या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळत आहे. ज्यामध्ये सद्यपरिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षण, दहावी, बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अ‌ॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. 1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरु होईल, अशी माहिती यावेळी विभागाने दिली.

महत्वाच्या बातम्या-

-आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

-सामान्यांची एकच मग धनंजय मुंडेंच्या दोन कोरोना चाचण्या का?, सोमय्यांचा सरकारला सवाल

-खा. सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार जाहीर

-‘अ‌ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती’चं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, शरद पवारांची विशेष फेसबुक पोस्ट

-रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धनंजय मुंडेंची ‘विजयी’ फेसबुक पोस्ट, म्हणतात…