Top news देश

1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17 राज्यात 1023 तबलिगी जमातीशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

तबलिगी जमातीमधील एकूण 23 हजार लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. देशातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तबलिगी जमातीमधील असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

देशातील 9 टक्के कोरोना रुग्ण हे 0-20 वयोगटातील आहेत. 33 टक्के रुग्ण हे 40-60 वयोगटातील आहेत. 17 टक्के रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातले आहेत आणि सर्वाधिक 42 टक्के रुग्ण हे 21 ते 40 वयोगटातील आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही 2902 पर्यंत पोहोचली आहे. कालपासून ते आतापर्यंत 601 कोरोना रुग्ण देशात आढळले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

-‘धनंजय मुंडे कळवा, हजार रुपये मिळवा’; सुरेश धस यांची घोषणा

-कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांना ‘येवले अमृततुल्य’तर्फे तरतरी देण्याचं काम

-“धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा”

-धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळला; मुंबईसाठी धोक्याचा इशारा

-वारकऱ्यांचा स्तुत्य आदर्श; एका आवाहनावर चैत्री वारी करणं टाळलं!