देश

पश्चिम बंगालमधील 107 आमदार करणार भाजपात प्रवेश; भाजपच्या या बड्या नेत्याचा दावा

BJP

बंगळुरू |  पश्चिम बंगालमधील 107 आमदार येत्या काळात भाजपात प्रवेश करणार आहेत, असा दावा भाजप नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि सीपीएमचे अनेक आमदार भाजपच्या गळाला लागल्याचा दावा रॉय यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळवल्यानंतर भाजपने विविध राज्यांतल्या विरोधी पक्षातले आमदार भाजपात सामिल करून घ्यायचा जणू धडाकाच लावला आहे.

गोव्यात काँग्रेस आमदारांचा गट पक्षात सामिल करून घेतल्यानंतर आणि कर्नाटकात काँग्रेस आमदारांच्या बंडांला पाठिंबा दिल्यानंतर आता भाजपने आपला मोर्चा वळवलाय तो पश्चिम बंगालकडे!

भाजपमध्ये प्रवेश करण्याऱ्या आमदारांची संभाव्य यादी आम्ही तयार केली असून ते आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य रॉय यांनी केलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामधला संघर्ष उभ्या देशाने पाहिला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे 18 खासदार निवडून आले. बंगालमधली संभाव्य संधी हेरून भाजप मोठा प्लॅन आखणार असल्याचं बोललं जातंय.