मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!

मुंबई | कुख्यात गँगस्टार डॉन अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी केली. सुनावणीसाठी अरुण गवळी मुंबईतून हजर होता.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने 13 मार्च रोजी 45 दिवसांची पॅरोलची रजा दिली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार गवळीला 27 एप्रिलला तुरुंगात हजर व्हायचे होतं. मात्र देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अरुण गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी करत नागपूर खंडपाीठाने 14 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. 10 मे पासून पुढील 14 दिवस ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, 8 मे रोजी अरुण गवळीच्या धाकट्या मुलीचं दगडी चाळीत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न पार पडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रिलायन्स जिओनं ‘या’ पॉप्युलर पॅकमध्ये केला मोठा बदल; रोज मिळत होता 2 जीबी डेटा

-दोन घरं, एक फार्म हाऊस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती?

-“कोरोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं”

-11 मे ते 17 मे पर्यंत ‘या’ परिसरात संपूर्ण लॉकडाऊन; पुणे मनपा प्रशासनाचा मोठा निर्णय

-तर मी सेहवागला सोडलंच नसतं- शोएब अख्तर