महाराष्ट्र पुणे

दुष्काळी भागात ठिबक सिंचन योजनेसाठी 80 टक्के अनुदान; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis 1

पंढरपूर | राज्यातील दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी 80 टक्के अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये बोलत होते. 

‘महाअ‌ॅग्रो टेक’च्या माध्यमातून शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यापुढे दुष्काळमुक्त आणि शाश्वत शेतीसाठी प्रयत्नशील राहील, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

गेल्या 15 वर्षात काँग्रेस सरकारने विविध योजनांवर जेवढा खर्च केला त्यापेक्षा जास्त खर्च आमच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

जलसंधारणाबरोबरच जलयुक्त शिवार संपदाची कामेही पूर्ण होत आहेत. युतीच्या मागील काळातील रखडलेली टेंभू योजना आम्ही युतीच्या काळातच पूर्ण केली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

गेल्या एकदशीला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येण्यास विरोध झाला होता. अनेक वर्षे रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच सोडवल्याने मराठा समाजाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. 

दरम्यान, राज्यकर्ता म्हणून मी कर्तव्य केलं. हे यश चळवळीचं आहे, असं मुख्यमंत्री सत्कार समारंभावेळी म्हणाले.