Top news औरंगाबाद महाराष्ट्र

मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

raj thackeray tea

औरंगाबाद | 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा (Raj Thackeray) होणार आहे. त्यापूर्वी राज ठाकरेंना मोठा झटका बसला आहे.

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी एक पत्रक काढत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचं म्हटलं आहे.

औरंगाबाद शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 आणि  कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सध्या राज्यात मनसे पक्षाच्या वतीने आगामी काळात मंदीर आणि मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून त्याला विविध राजकीय पक्ष, संघटना यांचा विरोध असून त्यांच्याकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे, असं औरंगाबाद पोलिसांनी पत्रक काढत सांगितलं आहे.

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध सामाजिक, राजकीय पक्ष, संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहर हे संवेदनशील असल्याने कायदा आणि सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी म्हणून आदेश लागू करणं जरूरी वाटतं, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो” 

अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे 

…म्हणून लोक भाजपला मतदान करतात- पृथ्वीराज चव्हाण 

“तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी?, बाबरी पडली तेव्हा तर तुम्ही बिळात लपला होतात” 

“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…”