खेळ

भारतीय संघाचा पराभव क्रिकेट फॅनच्या जिव्हारी; सामना गमावताच मृत्यू!

Jadeja and dhoni

पाटणा : भारतात क्रिकेट हा खेळ अनेकांसाठी जीव की प्राण आहे. विश्वचषकाच्या सेमिफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला. भारताच्या या पराभवाच्या धक्क्याने एका क्रिकेट फॅनचा मृत्यू झाला आहे. 

टीम इंडियाच्या पराभवानंतर बिहारच्या पाटण्यातील अशोक पासवान यांना हद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. 

रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीच्या प्रत्येक फटक्यावर अशोक पासवान टाळ्या वाजवत होते. मात्र जडेजा आऊट  झाल्यानंतर अशोक पासवान हिरमूसले असल्याचं समजतंय. 

भारताने सामना गमावल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात होती. त्याचदरम्यान अशोक पासवान यांना हद्यविकाराचा धक्का आला आणि त्यांचा मृत्यू झाला आहे.