Loading...
Top news देश

दूध आणण्यासाठी घराबाहेर पडला; पोलिसांच्या दंडुकेशाहीमुळे जीव गमावला

कोलकाता | देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना मारहाण केली. अशा मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.

बंगालमधील एका 32 वर्षीय व्यक्तीचा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...

हावडा येथे राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्ती बुधवारी दूध घेण्यासाठी बाहेर पडलेला असताना पोलिसांना त्याला मरेपर्यंत मारहाण केल्याचं कळतंय.

लॉकडाउनदरम्यान पोलिसांचे गर्दी होऊ न देणं हे काम आहे. पण आपल्या लाठीने एखाद्याचा जीव जाईस्तोवर मारहाण करणं आणि लोकांना नाहक त्रास देणं हे चुकीचं आहे. आम्हाला आवश्यक सेवांसाठी बाहेर जाण्याची परवानगी आहे, नाही का? असा संतप्त नागरिक सवाल करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-चंद्रकांत पाटलांचा उपक्रम; कोथरुडमध्ये 5 रुपयात घरपोच पोळी भाजी

-कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा; मोदी सरकारने केली ही मोठी घोषणा

-बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू मदतीसाठी पुढे सरसावली; केली 5 लाखांची मदत

-“लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी समजला का? जयंतरावांनी मोदींवर केलेली टीका योग्यच”

-सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय; मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

Loading...