देश

इथं द्वेषाचं राजकारण होणार नाही… आज प्रेम जिंकलं; विजयानंतर आपची प्रतिक्रिया

नवी दिल्ली |  दुसरीकडे दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे. 70 जागांपैकी 57 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. जवळजवळ आपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दिल्ली आप कार्यालयात आता विजयी जल्लोष सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभा निकालावर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आपचे नेते संजय सिंह यांनी दिल्लीत द्वेषाचं राजकारण हरलं आणि प्रेमाचं राजकारण जिंकली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

संपूर्ण दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकटे अरविंद केजरीवाल विरूद्ध संपूर्ण भाजप असं चित्र होतं. परंतू केजरीवाल यांनी संपूर्ण भाजपला तोंड देत विजयश्री खेचून आणली, असं सिंह म्हणाले. तसंच दिल्लीकरांनी केजरीवाल कट्टर देशभक्त आहेत, हे दाखवून दिल्याचं सिंह म्हणाले.

Loading...

दिल्लीत विकासाच्या नावावर आपने मतं मागितली आणि लोकांनी देखील विकासाला साथ दिल्याचं सिंह म्हणाले. आता यापुढची 5 वर्ष आणखी चांगलं काम करून दाखवणार, असं म्हणत त्यांनी दिल्लीकर नागरिकांना आश्वस्त केलं.

दुसरीकडे आम आदमी पक्षाने बहुमत गाठल्याने दिल्लीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली आहे. भाजपच्या पदरी अपयश पडल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“भाजपच्या पदरी अपयश…. मात्र 2024 लोकसभेला दिल्ली मोदींंच्याच पाठीशी उभी राहिल”

-दिल्लीत केजरीवालांची हॅट्रीक होणार…. पण ‘आप’ला सगळ्यात मोठा धक्का बसणार?

-‘आप’ला बहुमत; केजरीवालांच्या विकासापुढे महाराष्ट्र भाजपचे नेतेही काही करू शकले नाहीत!

-दिल्लीत भाजपचा पराभव दिसू लागताच शिवसेनेची सडकून टीका तर ‘आप’वर स्तुतीसुमनं!

-दिल्लीत पैसा हरला… केजरीवालांचा विकास जिंकला- नवाब मलिक