महाराष्ट्र मुंबई

आज कोपर्डीच्या महत्वपूर्ण सुनावणीस सरकारी वकील गैर हजर राहिलेच कसे?- संभाजीराजे भोसले

मुंबई |  कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात 7 तारखेला महत्त्वाची सुनावणी होती. मात्र या अतिशय महत्त्वाच्या सुनावणीला सरकारी वकिल गैरहजर राहिले. यावर इतक्या महत्त्वाच्या सुनावणीला वकील कसे काय गैरहजर राहू शकतात, अशा शब्दात खासदार संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.

ज्या कोपर्डीतील अमानवीय घटनेमूळे संपुर्ण मराठा समाज मनातून अस्वस्थ झाला, सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जागृत होऊन राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकवटला, या घटनेतील आरोपींच्या विरोधात न्यायालयात खटला चालू असताना आज महत्वपूर्ण सुनावणीस सरकारी वकील गैर हजर राहतात कसे?, असा सवाल त्यांनी ट्वीटरवरून विचारला आहे.

Loading...

कोपर्डी खटल्याचा सहा महिनयात निकाल लागावा, अशी मागणी वकिल अॅड. दिलीप तौर यांनी केली होती. मात्र सरकारी वकिल गैरहजर राहिल्याने खटल्याबाबतचा कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.

सरकारने या बाबतीत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता असताना, वकिलांच्यामुळे दिरंगाई होत असेल तर याला कोण जबाबदार? लोकांचा कायदा, सुव्यवस्थेवरचा विश्वास उडत आहे, राज्यसरकारने याबाबत त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर न्यायालयाला सहकार्य करणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-माझ्या भोवती महिला भगिणींचं कवच… मज काय कुणाची भिती- नरेंद्र मोदी

-कर्जमुक्ती करून आपण शेतकऱ्यांवर उपकार करत नाही- उद्धव ठाकरे

-बजेटवरून माजी अर्थमंत्र्यांच्या टीकेचा बाण आजी अर्थमंत्र्यांवर!

-माझ्या आमदारकीचा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेल- रोहित पवार

-रोहित पवारांच्या हेलिकॉप्टरच्या स्वप्नावर तरूणाचा थेट त्यांनाच प्रश्न!