दारू तस्करीला वळसे पाटलांचा दणका; 1221 गुन्हे दाखल, 472 जणांना अटक

मुंबई | कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वच आघाड्यांवर कठोर पावले उचलली आहेत. राज्याचा उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातील अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी चोहोबाजूच्या राज्य सीमांवर चौक्या उभारून तत्काळ नाकाबंदी करण्याचे आदेश मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

परराज्यातील अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी चोहोबाजूच्या राज्य सीमांवर कडक नजर ठेवण्यासाठी तत्काळ चौक्या उभारून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने तातडीने 18 सीमा तपासणी नाके उभारले असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करी प्रकरणी 1221 गुन्हे नोंदविले असून त्यात 472 आरोपींना अटक केली असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान,अवैध मद्यनिर्मिती वाहतूक, विक्रीविरुद्धच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक 18008333333, व्हाट्सअॅप क्रमांक 8422001133 तसेच ईमेल- [email protected] वर कराव्यात, असे आवाहन राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाविरोधातली लढाई मिळून लढू; मोदी-ट्रम्प यांची फोनवरून चर्चा

-अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत

-विरोधकांच्या टीकेनंतर कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचं महत्वाचं पाऊल!

-धक्कादायक, पुण्यात कोरोनाने घेतले आणखी दोघांचे बळी

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम”