Loading...
पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राला झालंय तरी काय?? अभिनेत्री मानसी नाईकची तरूणांकडून छेडछाड

पुणे |  पुरोगामी महाराष्ट्राला झालंय तरी काय? असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे. त्याच कारण म्हणजे पाठीमागच्या 7 दिवसांपासून महिलांच्या अत्याचारात झालेली वाढ! हिंगणघाट आणि औरंगाबाद इथलं प्रकरण ताजं असताना पुण्यातल्या रांजणगावात काही तरूणांनी अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.

5 तारखेच्या रात्री मानसी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव येथे गेली होती. मात्र त्या ठिकाणी काही तरूणांनी मानसीच्या अंगाला झटण्याचा प्रयत्न केला.

Loading...

आणखीनही धक्कादायक गोष्ट म्हणजे 5 तारखेच्याच रात्री मानसीच्या आईला काही तरूणांनी फोन करून तुझ्या मुलीला रांजणगाव रोडला मारून फेकून देऊ, अशा धमकीचे फोन केले, असं मानसीने सांगितलं. आम्ही मानसीचे काही व्हीडिओ काढलेले आहेत ते आम्ही व्हायरल करू, अशी धमकीही मानसीच्या आईला तरूणांनी दिली. मात्र आईला जर त्रास होत असेल तर मी शांत बसणार नाही, असा इशारा मानसीने दिला आहे.

दुसरीकडे मानसी ज्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला गेली होती त्यांच्याकडे तिने बोट दाखवलं आहे. मला आयोजकांनी मदत न करता अत्यंत असुरक्षित वातावरणात ठेवलं गेल्याचा आरोप मानसीने केला आहे.

दरम्यान, मुंबई पोलिस मला सहकार्य करत आहेत. मुंबईच्या साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये मी तक्रार दाखल केली आहे, असं मानसीने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-….म्हणून रोहित पवारांना तरूणाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी!

-चंद्रपुरात पोलिसांची लॉजवर धाड; 13 कॉलेज जोडपी ताब्यात

-कामं होत नसली की फक्त बहाणे सांगायचे; फडणवीसांची अजित पवारांवर टीका

-नाईट लाईफ करून श्रीमंतांच्या पोरांची सोय केली शेतकऱ्यांचं काय??- फडणवीस

Loading...

-अस्तनीतले निखारे विझवायलाच हवेत; मनसेचा एल्गार!

Loading...