मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. सुशांतने चित्रीकरण केलेला अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’मधील त्याची सहअभिनेत्री संजना संघी हिची आज चौकशी होणार आहे.

सुशांत आणि संजना हे जवळचे मित्र होते. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी दोघांना ‘दिल बेचारा’ सिनेमात घेतलं होतं. मुकेश यांच्या जबाबात संजनाचा उल्लेख झाल्याने आता संजनाला पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.

अखेरच्या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सुशांतची मनस्थिती कशी होती, त्याच्या मानसिक आरोग्याविषयी काही कल्पना होती का, यासारखे प्रश्न वांद्रे पोलीस संजना संघीला विचारण्याची शक्यता आहे.

सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) हा येत्या 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

-राज्यात जून महिन्यात आतापर्यंत जवळपास 29 लाख थाळ्यांचं वाटप, भुजबळांची माहिती

-वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

-कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी….., नवाब मलिक यांची महत्त्वाची माहिती

-औषधोपचारात महाराष्ट्र जगाच्या बरोबरीने उभा, काही औषधे मोफत देण्याचा सरकारचा विचार- मुख्यमंत्री