Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

अ‌ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले….

औरंगाबाद | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधवांवर आहे. माझ्याविरुद्ध शिवसेनेनं रचलेलं हे षडयंत्र आहे, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी गुन्हा नोंदवल्यानंतर केला आहे.

नेमकं कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला आहे याची मला माहिती नाही. मात्र, शिवसेनेनं औरंगाबादच्या नामांतरावरुन जे राजकारण केलं, त्यासंदर्भात मी जी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळेच सेनेनं माझ्याविरोधात षडयंत्र केलं आहे, असं हर्षवर्धन म्हणाले आहेत.

Loading...

येत्या दोन महिन्यात औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा अन्यथा मी त्यांच्या लोकांना इथे फिरु देणार नाही अशी भूमिका मी घेतली होती. माझ्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या पोटात गोळा उठला होता, त्यातूनच त्यांनी हा उपद्रव केला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने जाधवांविरोधात लेखी तक्रार दाखल केली. पीडित व्यक्तीने पोलिसांकडे हर्षवर्धन जाधवांवर अ‌ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधवांवर गुन्हा दाखल केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-….म्हणून अजित पवारांना भर सभागृहात मागावी लागली माफी!

-हे सरकार मुख्यमंत्री चालवतात की ‘सरकारी बाबू’; छत्रपती संभाजीराजे भडकले

-महाविकास आघाडीचा दणका; या निवडणुकीत भाजपचे सगळे उमेदवार पराभूत

-धनगर समाज माझा आहे, जातीचं राजकारण बाजूला ठेवा आरक्षणासाठी एकत्र या- मुख्यमंत्री

-आरक्षणासाठी लढणाऱ्या धनगर आंदोलकरांवरचे गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारची घोषणा

Loading...