मोदी सरकारचा दिल्लीकरांना दणका; निकालानंतर गॅस 144 रूपयांनी वाढला!

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. यात आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे, तर भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. यातच विधानसभा निवडणूक पार पडताच केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीकरांसाठी गॅस सिलेंडरचा दर तब्बल 144 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे निकाल लागताच दिल्लीकरांना गॅस सिलेंडर दरवाढीचा दणका बसला आहे. त्यामुळे आता 14 किलोचा गॅस सिलेंडर 858.50 रुपयांना मिळणार आहे.

या दरवाढीवर काँग्रेसने टीका केली आहे. कालच दिल्ली निवडणुकांचा निकाल लागला आणि आज भाजप सरकारने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. जनतेसमोर मांडायला कामच नसल्याने अशा परिस्थितीत दरवाढ केल्यास कोणत्या तोंडाने मतं मागायला जाणार, हे चांगलेच ठाऊक असलेल्या भाजप सरकारने दिल्लीचा निकाल लागताच सर्वसामान्यांना ‘महंगाई का करंट’ दिलाय, असं म्हणत काँग्रेसने टीका केली आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला 62 जागा, भाजपला 8 तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्लीत शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त!

-“अरे कशाला करताय बंगल्यांची दुरूस्ती… डागडुजी होण्याअगोदरच तुमचं सरकार पडणार”

-भाजप ही राष्ट्रीय आपत्ती म्हणणाऱ्या पवारांना ट्वीट करून भाजपचा खडा सवाल!

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत

-“शाहरूख खानसोबत तुलना हे तर माझं भाग्यच”