लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनने केला दावा

बिजिंग | लडाखनंतर चीननं आता भूतानमधील भूभागावर आपला दावा सांगितला आहे. ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या 58 व्या बैठकीत भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचं चीनने म्हटलंय.

मागील अनेक वर्षांमध्ये अभयारण्याच्या भूभागाबद्दल कधीही वाद झाला नव्हता. तथापि, भूतान आणि चीन दरम्यान कोणतंही सीमांकन झालेलं नाही. साकतेंग वन्यजीव अभयारण्य भूतानचा अविभाज्य आणि सार्वभौम भूभाग आहे, असं भूताननं स्पष्ट केलं आहे.

वन्यजीव अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा जागतिक निधी देण्यात आलेला नाही. पण जेव्हा या अभयारण्यासाठी पहिल्यांदा निधी देण्याची गरज भासली तेव्हा चीननं या संधीचा फायदा घेत या भूभागावर आपला दावा केला. चीनच्या या प्रकल्पाला केलेल्या विरोधानंतरही कौन्सिलनं याला मंजुरी दिल्याचं कळंतय. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

या कौन्सिलमध्ये जेथे चीनचा थेट प्रतिनिधी आहे, तेथे भूतानचा कोणताही थेट प्रतिनिधी या कौन्सिलमध्ये नाही. त्या जागतिक बँकेत बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेच्या प्रभारीदेखील आहेत. यापूर्वी 2 जून रोजी प्रत्येक योजनेप्रमाणे चर्चा सुरू असताना चीनी कौन्सिलचे सदस्य झोंगजिंग वांग यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप, म्हणाले….

-राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत

-गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

-टिकटॉकवरच्या बंदीनंतर कंपनीची प्रतिक्रीया, म्हणाले…

-अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय