कोरोनाचे भयानक वास्तव! नोकरी सुटल्याने बापाने पोटच्या मुलाला विकलं!

गुवाहाटी | देशात कोरोनामुळे दोन ते अडीच महिने लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांच्या हातचे काम गेलं. नोकरी गेल्याने घरात खाण्यासाठी काहीच नव्हतं. म्हणून एका बापनेच आपल्या 4 महिन्याच्या मुलाला विकल्याची धक्कादायक घटना आसाम मधील कोकराझार जिल्ह्यात घडली आहे.

दीपक भम्रा ही व्यक्ती प्रवासी कामगार म्हणून काम करत होती. लॉकडाऊनमध्ये पैसे कमावण्याचे कोणतेही साधन नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाने आपल्या 4 महिन्याच्या बाळाला अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये विकण्याचा निर्णय घेतला.

दीपक यांना तीन मुले आहेत. दीपक गुजरातमध्ये प्रवासी कामगार म्हणून काम करत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये काम गेल्यानंतर ते आसाममध्ये आपल्या गावी आले. काम गेल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आणखीनच बिघडली, त्यामुळे त्यांनी आपल्या बाळाला विकले.

स्थानिक एनजीओला बाळ विकल्याची माहिती समजताच पोलिसांच्या मदतीने या एनजीओने बाळाला सोडविलं आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी बाळाच्या पित्यासह आणखी दोन जणांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“कोरोना झालेल्या रुग्णांना पुण्यात कोणी बेड देतं का बेड?”

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी जोडले हात; म्हणाले, “देवा माझी मदत कर!

अडीच वर्षात बापानंच एकामागून एक केली 5 मुलांची हत्या; काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार उघड

चीन जग हादरवणारी गोष्ट करण्याच्या तयारीत?; पाकिस्तानला बनवणार बळीचा बकरा!

कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका; असा शिकवला जबरदस्त धडा!