क्राईम महाराष्ट्र

मुलाने जीव दिलेला बापाला नाही झाल सहन, स्वत:लाच लावून घेतला गळफास

शिर्डी – अहमदनगर जिल्हा्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने फास लावल्यानंतर मुलाच्या वडीलांनी देखील स्वत:ला गळफास लावून घेतल्याची दर्दैवी घटना घडली आहे.

कोपरगाव शहराजवळील संजिवनी साखर कारखाना परीसरात हि धक्कादायक घटना घडली आहे. 3 जुलैच्या मध्यरात्री राहुल संजय फडे या तरूणाने आपल्या घरातच  गळफास लावून घेतला आणि आपल जीवन संपवल. पोटच्या पोराने जीव दिल्याचा धक्का वडीलांना सहन झाला नाही व त्यांनी पण स्वत:ला गळफास लावून घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दुहेरी संकटाला सामोर जाव लागत आहे.

कोपरगावातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. मुलगा राहुल हा एका शैक्षणिक संस्थेत लॅब असिस्टंट म्हणून नोकरी करत होता. त्याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला एक दीड वर्षाचा मुलगाही आहे.

दरम्यान पोलिसांना आत्महत्यची नेमकी कारण माहीत नसल्याने तुर्तास आकस्मात निधन अशी नोंद कोपरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

-जुन्या रागाचा पारा चढला एवढा, मामीनेच बादलीत बुडवला चार वर्षाचा चिमुकला

-अचानक आलेल्या नाल्याच्या पुरामध्ये चौघांचा मृत्यु, बैलगाडीसोबत आजोबा नातूही गेले वाहून

-कोरोना असल्याच्या संशयाने तरुणीला फेकल बस बाहेर, तिथेच झाला मृत्यु