Loading...
महाराष्ट्र मुंबई

‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा केला. पुत्र पार्थ पवार यांच्या सोबतीने अजित पवारांनी गुढीची पूजा केली.

यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरु नका, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.

Loading...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या देशभर ‘21 दिवस लॉकडाऊन’च्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं, असं अजित पवार म्हणाले होते.

कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू नये! संसर्ग कुटुंबियांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन करत सरकार प्रत्येक संकटात जनतेसोबत असल्याही ग्वाही अजित पवारांनी दिली होती.

 

महत्वाच्या बातम्या – 

-जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी

-आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

-सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी

Loading...

-पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल

-“मी काहीही बंद केलं आहे असं सांगायला नाही तर राज्यातील जनतेला धन्यवाद द्यायला आलोय”

Loading...