…अन् भर पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला!

मुंबई |  राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून मनस्ताप झालेला सांगताना राष्ट्रवादीचे नेते अजित, पवार यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पहायला मिळाला. अजित पवारांच्या डोळ्यात भर पत्रकार परिषदेत अश्रू तरळले.

आपल्यामुळे साहेबांची बदनामी होते. मी अस्वस्थ झालो. यावेळी माझ्या सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवारांचा काहीही संबंध नाही. ना ते बँकेचे ना सभासद, ना त्यांची कुठे सही, तरीही त्यांचं नाव गोवलं गेलं याचं मला दु:ख आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

राजीनामा दिल्यानंतर मी शरद पवाराच्या नजरेला नजर मिळवू शकलो नाही, असंही अजित म्हणाले.

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषेदत अजित पवार यांच्यातला हळवा माणूस आज महाराष्ट्राला पाहायला मिळाला.

महत्वाच्या बातम्या-