“अरे बाबांनो, मी अन् मुख्यमंत्री शब्दांचे पक्के आहोत विरोधकांसारखा आम्ही शब्दांचा खेळ करत नाही”

मुंबई| राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका करण्यात आली. यावर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांनी केलेल्या टीकेवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी काय, मुख्यमंत्री काय आम्ही शब्दांचे पक्के आहोत आणि विरोधकांसारखा शब्दांचा, आकड्यांचा खेळ आम्हाला जमत नसल्याचं म्हणत विरोधकांना लक्ष्य केलं त्यासोबत त्यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती दिली.

राज्यात सध्या 33 डायलिसिस केंद्र कार्यरत आहेत. तर आणखी 20 केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. डायलिसिसची गरज असणाऱ्या कोणत्याही रुग्णाला राज्यात 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास करण्याची वेळ येऊ नये या दृष्टीने प्रत्येक दोन ते तीन तालुक्यांत असं प्रमाण ठरवून नवीन 75 डायलिसिस केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

दरम्यान, अजित पवारांनी अर्थसंकल्प नाही तर अजित पवारांनी केवळ पोकळ भाषण केलं केलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरे आज करणार रामजन्मभूमीत प्रवेश; असा असणार अयोध्या दौरा

-नाथाभाऊंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप घेणार ‘हा’ मोठा निर्णय

-अखेर ग्रामपंचायत सदस्यामधूनच होणार सरपंचाची निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी

सिनेविश्वातला जातीयवाद आताचा नाही… त्यासाठी काही माणसं कार्यरत- विक्रम गोखले

-“अमृता फडणवीस एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून बोलतीये हे महाराष्ट्राने स्विकारायला हवं”