महाराष्ट्र मुंबई

आपल्या घरात ‘असा’ नराधम होऊ देऊ नका हीच पीडितेला खरी श्रद्धांजली- अजित पवार

मुंबई | हिंगणघाट जळीतकाडांवरुन राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. दारोडा गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळेलच पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ नये हीच हिंगणघाटातल्या मृत बहिणीला आपली खरी आदरांजली ठरेल, असं म्हणत अजित पवार म्हणाले आहेत.

Loading...

हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाटवसियांच्या दुःखात सहभागी आहे, असं अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपीला 1 महिन्यात फाशी द्या- नवनीत राणा

-बारामतीत होणार रणजी सामना; पवारांनी करून दाखवलंच!

-या राक्षसाचा सुद्धा एन्काउंटर करा…. त्याचवेळी पीडितेला न्याय भेटेल- सक्षणा सलगर

-नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही- उद्धव ठाकरे

-सरकार पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं.. लवकरात लवकर न्याय देणार- बाळासाहेब थोरात