“शिधावाटपाच काम विनातक्रार व्हावं यासाठी पालकमंत्र्यांनी जातीनं लक्ष घाला”

मुंबई | कोरोना संकट काळात गोरगरीबाला रेशन दुकानांमार्फत धान्यवाटपाचं प्रमाण वाढवलंय. यात गैरप्रकार टाळून वाटप विनातक्रार व्हावं, तक्रार आल्यास तत्काळ निराकरण व शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केलं आहे.

राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा ३.८७ लाख मेट्रीक टनांवरून ७.७४ लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना १.५२ लाख मेट्रीक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या नाजूक स्थितीत शासकीय यंत्रणा सर्व स्तरावर उत्तम काम करत आहेत,ही बाब कौतुकास्पद आहे, असं त्यांनी म्हटलंय.

राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ७ कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी २ रु.प्रतिकिलोने गहू, ३ रु.प्रतिकिलोने तांदूळ रेशन दुकानांवर मिळतोय. केंद्र सरकारकडून ५ किलो मोफत तांदळाचं वाटप सुरू आहे. केशरी कार्डधारकांना ८ रु. प्रतिकिलोने गहू, १२ रु.प्रतिकिलोने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतलाय, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनानं राज्य स्तरावर १८००२२४९५० आणि १९६७ हे टोल-फ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात, असं त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”

-म्हणून… ससूनच्या निवासी डाॅक्टरांनी दिला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

-सगळा देश एकजुटीने लढत आहे, मात्र काही जण धर्माच्या नावाने धंदा करतायत- इरफान पठाण

-रिव्हर्स रेपो रेट 4 टक्क्यांवरून 3.75 टक्क्यावर,आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांची माहीती

-सगळा देश एकजुटीने लढत आहे, मात्र काही जण धर्माच्या नावाने धंदा करतायत- इरफान पठाण