पुणे महाराष्ट्र

उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार

पुणे |  पुणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत सरकराने कडक पाऊल उचललं आहे. यावर जिल्ह्यातील उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

उद्योजकांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय करू नका. त्यांच्यावर मोक्का सारख्या कडक कारवाई करण्याच्या सूचना अजित पवार यांनी पोलीस खात्याला दिल्या आहे.

Loading...

पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरसुद्धा उपस्थित होते.

दरम्यान,  पुणे परिसरात असणाऱ्या उद्योग वसाहतीमध्ये परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या उद्योजकांना त्रास देणाऱ्या टोळ्या वाढल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या विरोधात मोक्क्यासारखीची कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेे आहेत.

 

महत्वाच्या बातम्या- 

-मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे

-राज ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा वसा घेतल्यामुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर

-“मनसेच्या मोर्चामागे भाजपचाच हात”

-राज ठाकरेंवरील प्रेमापोटी दिव्यांग आजोबांनी नगरहून थेट गाठली मुंबई!

-“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही”