Top news पुणे

“…तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार चालणार”

uddhav thackeray and ajit pawar e1643624089946

पुणे | अधिवेशनाच्या आधी खूप काही बोललं गेलं की असं होईल, तसं होईल. पण मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे तोपर्यंत हे सरकार चालणार, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्ट केलं आहे.

अजित पवार पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

31 मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्रं त्यांना वेगळी संधी मिळणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं, असं अजित पवारांनी म्हटलंय.

जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं, असं अजित पवार म्हणाले.

आम्ही व्यवस्थित अर्थसंकल्प सादर केलाय. हा असा म्हणाला आणि तुम्हाला काय म्हणायचंय यावर उत्तर देणं हाच धंदा मला नाही, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron BA.2, वेळीच व्हा सावध!

‘एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत ऐकलं नाही तर…’; अजित पवारांचा इशारा 

‘RRR’ चिटपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मोडले मागचे सगळे Records

…तर मला विजय चौकात फाशी द्या- सुप्रिया सुळे 

पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…