कसं का होईना झालो ना चार वेळा उपमुख्यमंत्री- अजित पवार

बारामती | आम्ही चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. कसं का होईना चार वेळा झालो ना उपमुख्यमंत्री, भलेही मी माझ्या पद्धतीेने झालो. गंंमतीचा भाग सोडा म्हणलं साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले तर आपण चार वेळा उपमुख्यमंत्री होऊ शकतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बोर्डाची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बारामतीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

मागील पाच वर्षात बहिणीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. तुमच्या विचाराचे सहकारमंत्री म्हणून तुम्ही जर या पद्धतीने राजकारण करत असाल तर हे चुकीचं आहे. आम्हीही चारवेळा मुख्यमंत्री पाहिलेले कार्यकर्ते आहोत, असं म्हणत अजित पवारांनी मागील फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, अजित पवार जवळजवळ एक तासापेक्षा जास्त वेळ सभेत बोलत होते. त्यांना मध्येच बोलता बोलता ठसका लागला. तेव्हा त्यांनी शेजारील कार्यकर्त्याला पाण्याची मागणी केली. त्यानंतर पवार म्हणाले, विरोधक म्हणत असतील पाणी पिस्तोवर भाषण करतयं, असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या- 

मेगा भरतीमुळेच भाजपचं सरकार गेलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

“…अन् दादा म्हणाले पोरींनो फोटोचं राहूद्या काही अडचणी असतीलं तर सांगा”

“सावरकरांच्या भारतरत्नला विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या कोठडीत पाठवा”

अरे येड्या…लवकर गेलास; लक्ष्याच्या आठवणीत अशोकमामा भावूक

त्यावेळी मलाही बेळगाव पोलिसांनी मारहाण केली- शरद पवार