…तर आता कपडे काढून मला जावं लागेल- अजित पवारांची तुफान फटकेबाजी

पुणे | आता सगळंच जर माफ करायला लागलो, तर कपडे काढून मला जावं लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली आहे. ते जुन्नर येथे शिवप्रेमींच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर आता विजबिल माफीच्या चर्चा जोरदार होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी टोलेबाजी केली. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी विजबिल माफीचा प्रस्ताव सभेत मांडला होता. त्यावर अजित पवारांनी ते शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

अजित पवारांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) मुद्यांवरही भाष्य केलं. जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे तोपर्यंत राज्यातील जनतेच्या केसालाही धक्का लागणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, जनतेला 100 युनिट विज मोफत देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं उर्जामंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यावर फारसे उत्सुक नसल्याचं दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-तृप्ती देसाईंनी केला इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल

-शिवसेनेने घेतले दोन मंत्र्यांचे राजीनामे???

-देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे मग मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना का नाही- शरद पवार

-रुपाली चाकणकरांनी स्त्रियांना दिला खास संदेश म्हणतात…

-राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांना अभिवादन; दिला ‘हा’ खास संदेश