लोकांना मोफत योजना घेण्याची सवय लावू नका- अजित पवार

 मुंबई | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अनेक मंत्र्यांनी लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसचे नेते आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याचा विचार असल्याचं सांगितलं होतं. ही योजना महाराष्ट्रातही राबवण्याचा विचार होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राऊतांच्या या योजनेला नापसंती दर्शवली आहे.

ही योजना व्यवहार्य नाही. अशा घोषणा टाळायला हव्यात असं म्हणत अजित पवारंनी नितीन राऊतांना फटकारलं. नवा अर्थिक बोजा पेलण्याची राज्याची क्षमता नाही. अशा योजना व्यवहार्य नसतात. मंत्र्यांनी अशा घोषणा देणं टाळलं पाहिजे. लोकांना मोफत देण्याची सवय लावू नये, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दिल्ली छोटं राज्य आहे. हे मॉडेल महाराष्ट्रात चालू शकणार नाही. फुकट वीज दिली तर मंडळावर 10 हजार कोटींचा बोजा पडेल, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज मोफत देण्याबाबत महावितरण वीज कंपनीला 3 महिन्यात अहवाल देण्याचा आदेश दिला होता. लोकांना 100 नाही तर 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज देण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणारच!; शरद पवारांना विश्वास

-तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही?; पूनम महाजन म्हणतात…

-“शेतकऱ्यांनो आता वीज बीलं भरुच नका”

-“कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार; शेतकऱ्यांचं जीवनमान बदलाव यासाठी सरकार प्रयत्नशील!”

-किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच पण,…- सुप्रिया सुळे